IAPAR

Actor
at the
Center
IAPAR
International
Theatre Festival
Pune, India
Theatre Matters
previous arrow
next arrow
Slider

IAPAR International Theatre Festival features selected works that keep the actor at the center. It focuses on plays, which allows the actors to explore and create an innovative expression. The idea is to reach out across the globe and bring innovative work to the city of Pune. The festival encourages any kind of dramatic presentation, such as, a full-length play, short play, poetry presentation, story dramatisation, solo performance and any new creative innovations.

नाट्यवाचन स्पर्धा

नाट्य वाचन हा प्रकार एके काळी मराठीमध्ये चांगलाच रुळला होता. जसजसा नाटकाचा कालावधी कमी होत गेला तसतसा हा प्रकारही मागे पडला. चार-पाच अंकी नाटके तीन अंकी झाली. मग दोन अंकी झाली. त्यांच्याही हळू हळू एकांकिका होत गेल्या. पण त्यानंतर पुन्हा एकदा एकांकिकांचा कालावधी लेखकांना पुरेनासा झाला. आणि त्यातून दीर्घांक लेखन होत गेले.
या सगळ्या काळात सकस नाट्यवाचन मात्र मागेच राहिले. पंधरा वीस मिनिटांची किंवा एकांकिकांची नाट्यवाचने कधीमधी होऊ लागली. परंतु सलग संपूर्ण नाट्यानुभव देणारे दीड-दोन तासांचे नाट्यवाचन मात्र अभावानेच दिसू लागले.

आयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या निमित्तानं तीन वर्षांपूर्वी आपण कै. कुमार जोशी स्मृती प्रित्यर्थ नाट्यवाचन स्पर्धा सुरू केली. गेल्या तीन वर्षांच्या अनुभवांती असं लक्षात आलं की नाट्यवाचन या कलेचा आपल्याला काहीसा विसर पडला आहे. आणि परीक्षकांच्या सूचनेनुसार यंदाच्या वर्षी आपण नाट्यवाचन कार्यशाळा आयोजित करतो आहोत.
यंदाच्या वर्षी या कार्यशाळेत अश्विनी गिरी आणि अनिरुद्ध खुटवड हे दोघेजण मार्गदर्शन करणार आहेत.

 
नाट्यवाचन स्पर्धा २०२० प्रवेश अर्ज आणि नियमावली: https://docs.google.com/forms/d/1FqawE_Gx8YKjjT0dW0Jyxd2M_h614pjq-rO5qU_Fr4A/viewform?edit_requested=true